माझी खूपदा इच्छा झाली
बुद्ध होण्याची
एक स्त्रीही तर
त्याग करू शकते
आपलं सगळं काही
अन् घेऊ शकते
सत्याचा शोध...
पण मी
नाही बनू शकली
बुद्ध
कारण,
मी यशोदा होती;
राहुलची आई... यशोदा..!
---------------------------------------
मूल कवि - फलक
अनुवाद - कबीर उषा लक्ष्मण बोबडे