क - कवितेचा - 'हिमालय'



हिमालय कुठं आहे?

मी विचारलं

शाळेच्या बाहेर पतंग उडवत असलेल्या मुलाला 


'तिकडे - तिकडे' तो बोलला

जिकडे त्याचा 

तं

ग 

उडत होता


मला मान्य आहे

मला पहिल्यांदा कळलं-

हि

मा

य 

कुठाय ते !

-------------------------------------

● मुळ कवी - केदारनाथ सिंग

● अनुवाद - कबीर उषा लक्ष्मण बोबडे




Previous Post Next Post